Tech Update : व्हॉट्सअ‍ॅप वापरताय ? ही बातमी तुमच्याचसाठी

Tech Update : व्हॉट्सअ‍ॅप वापरताय ? ही बातमी तुमच्याचसाठी

Published by :
Published on
फेसबुकचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप काही फोनसाठी सपोर्ट बंद करणार आहे.व्हॉट्सअ‍ॅप बीटाचे 2.21.50 व्हर्जन iOS 9 आणि त्यापूर्वीचे सपोर्ट करणाऱ्या डिव्हाईसला आता सपोर्ट करणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने सध्या आपल्या FAQ पेजला अपडेट केले नाही. मात्र एकदा हे व्हर्जन सार्वजनिक झाल्यानंतर ते अपडेट केले जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ असा की, iPhone 4 आणि iPhone 4s फोनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही.सध्या iPhone 5 हा शेवटचा आयफोन आहे, ज्यावर व्हॉट्सअ‍ॅप कार्यरत आहे, आयफोन 5 ला 10.3 पर्यंत अपडेट मिळाले आहे. अँड्रॉईड युजर्संसाठी व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन 4.0.3 आणि त्यानंतरच्या अँड्रॉईडवर चालणार्‍या स्मार्टफोनला सपोर्ट करते.त्याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप काही यूआय (यूजर इंटरफेस) वरही काम करत आहे, ज्यामुळे युजर्संना आर्काइव्ह चॅटमध्ये पाहता येणार आहे, असे म्हटले आहे. आर्काइव्ह चॅट्सची येणारी सर्व नोटिफिकेशन म्यूट असणार आहेत. म्हणजेच, युजर्सला आर्काइव्ह चॅट्समध्ये येणारे मेसेज समजणार नाहीत. अशी सूत्राची माहिती आहे.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com