ट्विटरची ‘ही’ सेवा होणार बंद

ट्विटरची ‘ही’ सेवा होणार बंद

Published by :
Published on

भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेले काही दिवस चर्चेचा विषय बनला आहे. भारतातही ट्विटरमुळे अनेक वाद उदभवले आहेत. असे असून सुध्दा ट्विटर हे आजही एक प्रमुख समाज माध्यम म्हणून वापरले जाते. मात्र आता ट्विटरने फ्लिट फीचर सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत असून, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी या फीचरच्या बदल्यात नवी सुविधा सुरु करण्याची मागणी ट्विटरकडे केली आहे.

या फीचरच्या माध्यमातून युजर आपले फोटो (Photo), व्हिडीओ (Video) पोस्ट करु शकत होते आणि हे फोटो, व्हिडीओ 24 तासांनंतर आपोआपच नाहीसे होत होते. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर आता येत्या 3 ऑगस्टपासून फ्लिट फीचरची सुविधा बंद करणार आहे. ट्विटरने ही फ्लिट फीचर सुविधा गतवर्षी भारत, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील या देशांमध्ये तपासणी तत्वावर सुरु केली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही सुविधा जागतिक स्तरावर सुरु करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com