Twitter Down For Thousands Of Users
Twitter Down For Thousands Of Users

Twitter Blue Tick Subscription : पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं ब्लू टिक हटवणार; 1 एप्रिलपासून नवा नियम

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. आता कंपनीने आधी दिलेल्या ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेड सबस्क्रिप्शन नसलेल्यांना ब्लू टिक मिळणार नाही.

ज्या लोकांना यापूर्वी ब्लू टिक मोफत मिळाले होते त्यांना ते टिकवून ठेवण्यासाठी आता ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. जर कोणी असे केले नाही तर 1 एप्रिलनंतर खात्यातून ब्लू टिक काढून टाकले जाईल. 1 एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 900 रुपये प्रति महिना शुल्क आहे. ट्विटरकडून परिपत्रक जारी करत नवीन सूचना देण्यात आल्या आहेत.

तुम्हाला तुमच्या खात्यावर फ्री ब्लू टिक टिकवून ठेवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला १ एप्रिलपूर्वी ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतातील वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लूसाठी 650 रुपये आणि Android आणि iOS वापरकर्त्यांना दरमहा 900 रुपये द्यावे लागतील. ज्यांनी अद्याप ट्विटर ब्लू चं सबस्क्रिप्शन घेतलं नसेल त्यांच्या अकाऊंटवर 1 एप्रिल नंतर फ्री ब्लू टिक दिसणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com