'या' अभिनेते, खेळाडू, राजकारणी लोकांच्या अकाऊंटवरुन ट्विटरने ब्लू टिक हटवले
सीईओ इलॉन मस्क यांनी लेगसी व्हेरिफाईड अकाउंटवरील ब्लू टिक्स काढून टाकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गजांच्या ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत.
जर एखाद्या युझरला ब्लू टिक हवी असेल किंवा आधीच मिळालेली ब्लू टिक कायम ठेवायची असेल तर त्याला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरु होते. मोबाईल युझरसाठी ते दरमहा 900 रुपये आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी 12 एप्रिललाच घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकले जातील. आता सर्वांचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे.
यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार ते महेंद्रसिंह धोनी, आणि अजित पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, यांचा समावेश आहे.
कुणाची ब्ल्यू टिक गेली
एकनाथ शिंदे
मायावती
नितीश कुमार
प्रकाश आंबेडकर
पृथ्वीराज चव्हाण
संजय राऊत
राहुल गांधी
प्रियंका गांधी
योगी आदित्यनाथ
अमिताभ बच्चन
रोहित शर्मा
विराट कोहली
महेंद्रसिंह धोनी
एमके स्टॅलिन
नाना पटोले
नितेश राणे
शाहरुख खान
सलमान खान
अक्षयकुमार
आलिय भट्ट
कुणाची ब्ल्यू टिक अजून आहे
उद्धव ठाकरे
राज ठाकरे
देवेंद्र फडणवीस
अजित पवार
अतुल लोंढे
राष्ट्रवादी