Twitter Blue Tick : ट्विटरचा 8 डॉलरच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. तेव्हापासूनच ट्विटर डील फार चर्चेत आहेत. शिवाय ट्विटरची मालकी मिळाल्यापासून मस्क त्यांनी घेतलेले अनेक मोठे निर्णय जगभरात चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यांनी ट्विटर कंपनीमध्ये पदभार स्वीकारताच, सर्वात आधी ब्लू टिकसाठी 8 डॉलर शुल्क द्यावे लागणार ही घोषणा केली.
मात्र ट्विटर कंपनीने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द केला आहे. ही सर्व्हिस सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या संख्येत झपाट्याने वाढू लागली होती, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत.
ॲप बनवणाऱ्या जेन मंचुन वोंग यांनी सांगितलं की, ट्विटरने 8 डॉलरच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे घेतला आहे. अनेक ट्विटर युजर्सने शुक्रवारी सांगितलं की, नवीन ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सेवा त्यांच्या iOS ॲपवरून अचानक गायब झाली. यानंतर युजर्स चांगलेच संतापले होते.