युट्यूबवरील व्हिडीओ डाउनलोड करायचाय; मग 'ही' घ्या सोपी पध्दत
युट्यूबवरील शॉर्ट्स व्हिडिओंना लोकांची खूप पसंती मिळत आहे. युट्यूबवर सर्वप्रकारचे कंटेन्टही उपलब्ध आहे. युट्यूब वापरकर्त्यांना आपल्या आवडत्या व्यक्तींचा कंटेन्ट, व्हिडीओ सहजरित्या उपलब्ध करून देण्याचे काम युट्यूब करत असते. तसेच एखादे गाणे किंवा व्हिडिओ पाहण्याची इच्छा झाली की युट्यूबवर ते लगेच सर्च करून पाहू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्हाला आवडणारा कंटेन्टही तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवू शकणार आहात. तुम्हाला युट्यूबवरील शॉर्ट व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी एक सोप्या पर्यायाचा वापरता करू शकता. त्यामुळे तुम्ही युट्यूब शॉर्ट व्हिडिओ सहजरित्या व्हॉटसअॅप स्टेटसमध्ये ठेवू शकणार आहात. तर या लेखातून आम्ही तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
युट्यूबवरील शॉर्ट व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी त्या व्हिडिओवर क्लिक करून त्यामधील शेअर पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर ती लिंक कॉपी करून घ्यायची आणि त्यानंतर गूगलवर जाऊन ‘Shortsnoob.com’ सर्च करायचे आहे.
त्यानंतर ते ओपन झाल्यावर कॉपी केलेली लिंक त्यामध्ये पेस्ट करायची आहे.
ते झाल्यावर डाऊनलोड पर्यावर क्लिक करून हा व्हिडिओ मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल.
Shortsnoob.com या वेबसाईटचा अॅपही उपलब्ध आहे.