Tech Update : मोटोरोलाचा स्वस्त फोन भारतात झाला लाँच

Tech Update : मोटोरोलाचा स्वस्त फोन भारतात झाला लाँच

Published by :
Published on

मोटोरोला इंडियाने भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Moto E7 Power लाँच केला आहे. Moto E7 Power हा फोन भारतात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह लाँच झाला आहे.

Moto E7 Power चे फीचर्स

  • Moto E7 Power मध्ये अँड्रॉइड 10 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे.
  • फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर, 4 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे.
  • फोनचा मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा तर दुसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच पुढील बाजूला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही आहे. कॅमेरासाठी पोट्रेट, पॅनोरमा, फेस ब्युटी असे अनेक मोड्स देण्यात आले आहेत.
  • कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, GPS/A-GPS, FM रेडिओ, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅक मिळेल.
  • फोनला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी 14 तासांचा व्हिडिओ प्ले बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.
  • Moto E7 Power हा फोन भारतात दोन व्हेरिअंटमध्ये लाँच झालाय. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 7 हजार 499 रुपये आहे. तर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 299 रुपये आहे.
  • हा फोन भारतात २६ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com