टाटाने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार केली लाँच; किंमत आहे एवढी

टाटाने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार केली लाँच; किंमत आहे एवढी

Tata Motors ने अखेर आपली बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tioga EV लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

Tata Motors ने अखेर आपली बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tioga EV लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे. Tioga EV एकाच चार्जवर 315 किमीची रेंज देईल. त्याचे बुकिंग पुढील महिन्यात 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जानेवारी 2023 पासून वितरण केले जाईल. DC फास्ट चार्जरसह Tiago बॅटरी 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी 57 मिनिटे लागतील. टाटाच्या सर्वात स्वस्त टियागो इलेक्ट्रिक कारमध्ये दोन ड्रायव्हिंग मोड मिळतील. ही EV 5.7 सेकंदात 0 ते 60 kmph चा वेग पकडेल. यात 8 स्पीकर सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ORVM आणि बरेच काही मिळते.

टाटा कंपनीने ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 7 प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. हे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग पर्यायांसह येईल. हे XE, XT, XT, XZ+, XZ+Tech LUX, XZ+ आणि XZ+Tech LUX व्हेरियंटमध्ये येईल. त्याच वेळी, 19.2 KWh ते 24 KWh पर्यंतच्या बॅटरी पॅकचा पर्याय असेल. यामध्ये 3.3 KV AC ते 7.2 KV AC पर्यंत चार्जिंग पर्याय मिळतील. Tata Tiago EV ची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपयांच्या दरम्यान असेल.

टाटा मोटर्सच्या सांगितल्यानुसार Tiago EV ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या EV वर 1,60,000 किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वॉरंटी उपलब्ध असेल. Tiago EV च्या पहिल्या 10,000 बुकिंगपैकी 2,000 युनिट्स विद्यमान टाटा EV वापरकर्त्यांसाठी राखीव असतील.

टाटाने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार केली लाँच; किंमत आहे एवढी
Vivo Y73t 6000mAh बॅटरीसह लॉन्च, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com