shameful act at google | 500 हून अधिक कर्मचार्‍यांचे सुंदर पिचाई यांना खुले पत्र

shameful act at google | 500 हून अधिक कर्मचार्‍यांचे सुंदर पिचाई यांना खुले पत्र

Published by :
Published on

टेक जायंट गुगलच्या 500 हून अधिक कर्मचार्‍यांनी अल्फाबेट इंक आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना खुले पत्र लिहून अत्याचार करणार्‍यांना संरक्षण देणे थांबविण्याची मागणी केली आहे. यासह, सर्व कर्मचार्‍यांना गैरवर्तन मुक्त वातावरण देण्याबाबतही पत्रात म्हटले आहे. गुगलचे माजी अभियंता एमि नीटफेल्ड(Emi Nietfeld) यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिलेल्या अभिप्रायानंतर कर्मचार्‍यांनी हे पत्र लिहिले.

एमिन यांनी लिहिले की, 'मला त्रास देणारी व्यक्ती माझ्या शेजारीच बसली होती. माझ्या मॅनेजरने सांगितले की एचआर त्याची जागाही बदलू शकत नाही. त्यामुळे घरुन काम का किंवा सुट्टीवर जा." शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या पत्रात असे लिहिले आहे की, 'हा एक दीर्घ पॅटर्न आहे, जिथे छळ होत असलेल्या व्यक्तीला संरक्षण देण्याऐवजी अत्याचारी व्यक्तीलाच संरक्षण दिले जाते.' छळाचा अहवाल देणाऱ्या व्यक्तीला तो सहन करण्यास भाग पाडले जाते आणि सामान्यत: कंपनी सोडून जावे लागते. त्याचवेळी, जो त्याला त्रास देतो त्याला त्याच्या वागण्याचे बक्षीस दिले जाते. "

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com