तंत्रज्ञान
Smart Card : ज्येष्ठ नागरिकांना 30 जूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढता येणार
दिलेल्या मुदतीत स्मार्ट काढून घेण्याचे आवाहन
Smart Card : 1 जुलैपासून ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. स्मार्ट कार्ड नसेल, तर सवलतीत प्रवास करता येणार नाही, फुल तिकीट काढावे लागेल. त्यामुळे दिलेल्या मुदतीत स्मार्ट काढून घेण्याचे आवाहन पैठण बसस्थानक प्रमुख गजानन मडके यांनी केले आहे. (Senior citizens will be able to withdraw their smart cards till June 30)
ज्येष्ठ नागरिकांना 30 जूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढता येणार आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, नागरिक आणि ज्येष्ठ असल्याचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर घेतला जातो. आधार कार्डशी संलग्न माहिती प्राप्त झाल्यावर नावनोंदणी केली जाते. ओटीपीसाठी सोबत मोबाईल असावा लागतो. असं देखील मडके म्हणाले.