Samsung Galaxy M02 भारतात लाँच
लोकशाही न्यूज नेटवर्क
स्मार्टफोन मार्केटमधील आघाडीची कंपनी सॅमसंगने भारतात नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी M02लाँच करणार आहे . गॅलेक्सी एम सीरिजमधील हा सॅमसंग कंपनीचा एक नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन आहे. गॅलेक्सी M02 बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Samsung Galaxy M02 चा प्रोसेसर :
फोनमध्ये ड्युअल सिमकार्डसोबत अँड्रॉइड 10 वर आधारित One UI चा सपोर्ट आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ इन्फिनिटी व्ही डिस्प्ले मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आहे. 3 जीबीपर्यंत रॅम आणि 32 जीबीपर्यंत स्टोरेज यामध्ये आहे.
Samsung Galaxy M02 चा कॅमेरा :
Samsung Galaxy M02 ला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. कॅमेऱ्यासोबत ब्युटी आणि पोट्रेटसारखे अनेक मोड्स आहेत. याशिवाय फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे.
Samsung Galaxy M02 ची किंमत :
भारतात Samsung Galaxy M02 ची किंमत 6 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन सध्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि रेड अशा चार कलर्सच्या पर्यायांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.