Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आली समोर
Samsung Galaxy A52s 5G चा भारतीय लाँच अगदी जवळ आहे. काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनचे पोस्टर्स रिटेल स्टोर्सवर झळकल्याची बातमी आली होती. त्यामुळे सॅमसंग चाहत्यांच्या उत्सुकता वाढली आहे. अनेक लिक्स आणि रिपोर्ट्समधून या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. आता सॅमंसगच्या अधिकृत घोषणेच्या आधी गॅलेक्सी ए52एस 5जी फोनची किंमत लीक झाली आहे.
Samsung Galaxy A52s 5G ची भारतीय किंमत
सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात येणार आहे. आणि या दोन्ही मॉडेल्सची किंमत प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने दिली आहे. या माहितीनुसार फोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 35,999 रुपयांमध्ये सादर केला जाईल. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हर्जनची किंमत 37,499 रुपये ठेवण्यात येईल.
Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वनयुआय 3 वर चालतो.
सॅमसंगने आपला हा फोन ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हा फोन IP67 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. ड्युअल मोड 5G आणि इतर बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये Samsung Pay, Samsung Knox आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.