Royal Enfield Scrambler 650 लवकरच भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या काय असू शकतात फीचर्स आणि इंजिन
रॉयल एनफील्ड आपल्या सहा बाईक भारतात लॉन्च करणार आहेत. ज्यामध्ये रॉयल एनफील्ड हंटर 350 लाँच करण्यात आली आहे आणि त्यानंतर कंपनी लवकरच 650 सीसी सेगमेंटमध्ये नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम्बलर 650 सादर करणार आहे. कंपनीने या बाईकच्या लॉन्च तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, कंपनी डिसेंबर 2022 मध्ये सादर करू शकते. जर तुम्हीही या बाईकची वाट पाहत असाल, तर या बाईकच्या लॉन्चपूर्वी जे तपशील समोर आले आहेत ते जाणून घ्या.
कंपनीने तिच्या लॉन्च डेटचा खुलासा केलेला नाही पण लॉन्चपूर्वी ही बाईक टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा स्पॉट झाली आहे. स्पॉटेड बाईकवरून मिळालेल्या माहितीनुसार, या बाईकची रचना आणि एकूणच डिझाईन कंपनीच्या सध्याच्या बाईक Scrum 411 प्रमाणे असणार आहे परंतु या डिझाइनसोबत अनेक फीचर्स जोडण्यात आले आहेत. बाइकला क्लासिक लुक देण्यासाठी रॉयल एनफिल्ड सिंगल पीस सीट, वायर्ड स्पोक व्हील, टियर ड्रॉप डिझाइनसह इंधन टाकी, राउंड हेडलाइट आणि टेल लाइट यांसारखे अपडेट मिळतात.
मिळालेल्या माहितीनुसार Royal Enfield या Scrambler 650 मध्ये 648 cc चे पॅरलल इंजिन देणार आहे, या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स दिला जाईल. हे इंजिन 47 bhp पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे तेच इंजिन आहे जे कंपनीने आपल्या सध्याच्या Continental 650 GT मध्ये दिले आहे परंतु हे इंजिन या बाइकमध्ये काही अपडेट्ससह दिले जाईल.