8999 रुपयांचा स्मार्टफोन बाजारात, जाणून घेऊयात फिचर्स विषयी....
रिअलमीचा नवीन स्मार्टफोन (smart phone)आज लाँच होणार असून कमी किमतीत जास्तीत जास्त फिचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. रिअलमी सी 31 (Realme C31) हा रिअलमी कंपनीचा नवीन स्मार्टफोन आज 12 वाजेनंतर विक्रीस खुला करण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी, 13 मेगा पिक्सेल कॅमेरा, 4 मेगा पिक्सेल रॅम, Unisoc प्रोसेसर, आणि साईड फिंगरप्रिंट देण्यात आले आहे.
रिअलमी सी 31 स्मार्टफोन हा दोन रॅम आणि स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज असलेला फोन 8999 रुपयांना तर 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असलेला मोबाईल हा 9999 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये डार्क ग्रीन आणि लाईट सिल्वर कलर उपलब्ध आहेत.
रिअलमी सी 31 मध्ये 6.5 इंचाचा असून HD आणि LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड 11 व्हर्जन असून रिअलमी UIR एडिशन वर चालतो. तसेच यांत OCTA CORE Unisoc T612 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 4 GB पर्यंत रॅम आणि 64 GB पर्यंतची इंटर्नल स्टोरेज आहे. त्यासोबतच बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर्ससह यांत साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे. ज्यामध्ये Led फ्लॅश सह 13 मेगा पिक्सेल प्रायमरी सेन्सर, 2 मेगा पिक्सेलची मायक्रो लेन्स आणि 2 मेगा पिक्सेलची ब्लॅक आणि व्हाइट लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोन मध्ये 5 मेगा पिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअप साठी या स्मार्टफोन मध्ये 10 वॅटच्या फास्ट चार्जिंगसह 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
HDFC आणि SBI बँक धारकांना या मोबाईल वर सवलती देण्यात येणार आहे. मोठ्या व्हेरियंट वर 500 तर छोट्या व्हेरियंट वर 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. नो कॉस्ट EMI चा पर्यायही देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 24 महिने फक्त 433 रुपये हप्ता देऊन विकत घेता येईल