Pure EV electric bike
Pure EV electric biketeam lokshahi

Pure EV ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, एका चार्जवर 140KM धावणार

Pure EV इलेक्ट्रिक बाईकची वैशिष्ट्य आणि आॅफर जाणून घ्या
Published by :
Shubham Tate
Published on

Pure EV etryst 350 Price and Feature : इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Pure EV ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल Pure EV Etryst 350 लाँच केली आहे. कंपनीने या बाइकला असा लुक दिला आहे की तुम्हाला ती पेट्रोल बाईक वाटेल. विशेष बाब म्हणजे ही बाईक 140 किमी एका चार्चमध्ये धावणार आहे. धावण्याच्या बाबतीत ही कोणत्याही पेट्रोल बाईकपेक्षा कमी नाही. निळा, काळा आणि लाल अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यत आली आहे. 'मेक इन इंडिया' उपक्रमाने प्रभावित होऊन, ही बाईक त्याच्या हैदराबाद येथील केंद्रात डिझाइन आणि तयार करण्यात आली आहे. (pure ev etryst 350 electric bike launched offer 140km range)

Pure EV electric bike
Tata चा धमाका; तीन SUV केल्या एकाच वेळी लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

140KM ची रेंज

Pure EV ETRYST 350 इलेक्ट्रिक मोटरसायकल 3.5kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी 140 किमी पर्यंत प्रवास करू शकते. बाइकचा प्रति तास टॉप स्पीड 85 किमी आहे. बाईकची लोड क्षमता 150 किलो आहे.

Pure EV electric bike
Instagram इतरांना तुमचं लोकेशन देतय का? सीईओनीं दिलं हे उत्तर

कंपनीच्या बाईकमध्ये दिलेल्या इन-हाउस बॅटरी पॅकवर 5 वर्षे / 50 हजार किमी. रु. पर्यंत वॉरंटी ऑफर करत आहे. कंपनीचा दावा आहे की ETRYST 350 इलेक्ट्रिक मोटरसायकलची कामगिरी 150cc मोटारसायकलच्या तुलनेत आहे.

या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत 154,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. सुरुवातीला ही मेट्रो शहरे आणि टियर-1 शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. कंपनीच्या 100 डीलरशिपद्वारे त्याची विक्री केली जाईल. यात तीन ड्राइव्ह मोड मिळतात - ड्राइव्ह, क्रॉसओव्हर आणि थ्रिल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com