केंद्र सरकारचा मोठा निर्णय; फोनमधले Pre Install Apps होणार बंद
Admin

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; फोनमधले Pre Install Apps होणार बंद

केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. फोनमधले Pre Install Apps बंद करण्याचा हा निर्णय आहे. भारताचे आयटी मंत्रालय हेरगिरी आणि यूझर्सच्या डेटाचा गैरवापर करण्याच्या काळजीने हा विचार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नवीन सुरक्षा नियमांनुसार प्री इंस्टॉल अ‍ॅप्स काढावे लागणार आणि प्रमुख ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्सची अनिवार्य स्क्रीनिंग करण्याची परवानगी दिली जाईल.चिनी अ‍ॅप्स आणि त्यांच्या सुरक्षा धोरणाबद्दल सरकारने अनेकदा चिंता व्यक्त केली आहे.

मात्र, अद्याप या प्रकरणी सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.प्री-इंस्टॉल केलेल्या अपवर सरकार लगाम घालणार आहे Google ने भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या Android ऑपरेटिंग सिस्टम आणि गुगल बिलिंगमध्ये अनेक बदलांची घोषणा केली आहे. सरकार प्रत्येक प्रमुख ऑपरेटिंग सिस्टम अपडेट यूझर्ससाठी रोलआउट करण्यापूर्वी स्क्रीनिंग अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com