ट्विटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट

ट्विटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट

Published by :
Published on

ट्विटरने गेल्या वर्षी आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस ट्वीट सादर केले, जेणेकरुन युजर्स त्यांच्या आवाजासह ट्वीट करू शकतील. मजकूर टाईप न करता ट्वीटरवर तातडीने ट्वीट पोस्ट करण्यास व्हॉईस ट्वीट मदत करते. आपण आपले प्रारंभिक व्हॉईस ट्वीट पोस्ट केल्यानंतर तुमचा मजकूर ट्वीट्सला फॉलोअपच्या रुपात जोडू शकता. हे केवळ ट्वीट करणाऱ्या युजर्ससाठीच नव्हे तर त्यांच्या फॉलोअर्ससाठीही उपयुक्त आहे. फॉलोअर्सना एक वेगळा अनुभव घेता येतो. कारण ते ट्वीट केलेला संदेश वाचण्याऐवजी ते ट्वीट ऐकू शकतील.

व्हॉईस ट्वीट्स ट्विटरवर एक पर्सनल टचही आणतात. कारण लोक आपल्या आवाजाचा वापर करून मायक्रोब्लॉगिंग नेटवर्कवर अपडेट पोस्ट करण्यात सक्षम असतात. गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच झाल्यापासून ट्विटरवर व्हॉईस ट्वीट आतापर्यंत आयओएस युजर्ससाठी मर्यादित आहे. याचा अर्थ असा की केवळ आयओएस अ‍ॅपसाठी ट्विटरमध्ये आपले व्हॉइस ट्वीट रेकॉर्ड करण्याची आणि पोस्ट करण्याची क्षमता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com