Oppo Reno 9
Oppo Reno 9 Team Lokshahi News

Oppo Reno 9 आणि IQoo 11 सिरीज लाँच होण्यापूर्वी वैशिष्ट्ये लीक...

Oppo कंपनी अनेक दिवसांपासून नवीन सिरीज लाँच करण्याच्या तयारीत असून या सीसीरिजचे काही वैशिष्ट्ये लीक झाल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

Oppo कंपनी अनेक दिवसांपासून नवीन सिरीज लाँच करण्याच्या तयारीत असून या सीसीरिजचे काही वैशिष्ट्ये लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच iQOO कंपनी iQOO 11 आणि iQOO 11 Pro च्या iQOO 11 सीरीजवर काम करत असून अलीकडेच दोन्ही स्मार्टफोन्सच्या लॉचिंगची माहिती समोर आली आहे.

Reno 9 स्मार्टफोनमध्ये Qualcomm SM7325 प्रोसेसर (Snapdragon 778G) आणि Reno 9 Pro मध्ये MediaTek 6895 चिप (डायमेंशन 8000) चिपसेट असू शकतो. तसेच Reno 9 मध्ये 64-megapixel कॅमेरा असेल, तर Reno 9 Pro मध्ये 50-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, रेनो 9 मालिका AMOLED पॅनेल आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज असण्याची शक्यता आहे.

91Mobiles च्या रिपोर्टनुसार, Oppo Reno 9 सीरीजच्या रिटेल बॉक्सचे चित्र लीक झाले आहे, ज्यामध्ये बॉक्सच्या उजव्या बाजूला 9 आणि बॉक्सच्या डाव्या बाजूला Reno लिहिलेले आहे.दरम्यान, Oppo Reno 9 मालिकेबद्दल आतापर्यंतच्या सर्व लीक रिपोर्ट्सनुसार, Reno 9 ची किंमत 30,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

टिपस्टर योगेश ब्रार यांच्या मते, iQOO 11 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz असू शकतो. या आगामी हँडसेटमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 2 चिपसेट मिळू शकतो. याशिवाय हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो.iQ11 व्यतिरिक्त, iQOO 11 Pro देखील लॉन्च केला जाऊ शकतो. काही काळापूर्वी त्याचे फीचर्सही ऑनलाइन लीक झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, आगामी फोनमध्ये 6.78-इंच E5 AMOLED स्क्रीन मिळू शकते. तसेच, हँडसेटमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,700mAh बॅटरी मिळू शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com