मजबूत बॉडी असलेला ‘हा’ स्मार्टफोन येणार भारतीयांच्या भेटीला
नोकिया आपला मिलिटरी ग्रेड स्मार्टफोन Nokia XR20 भारतात लाँच करणार आहे. कंपनीने या फोनच्या लाँचची माहिती ट्विटरवरून दिली होती. आज कंपनीने या फोनच्या प्री-बुकिंगची तारीख सांगितली आहे. Nokia XR20 स्मार्टफोन भारतात 20 ऑक्टोबरपासून प्री बुक करता येणार आहे.
वैशिष्ट्ये :
▪️ Nokia XR20 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass Victus च्या सुरक्षेसह येतो.
▪️ पंच होल कॅमेरा असेलेल्या नोकिया XR20 मध्ये Qualcomm Snapdragon 480 चिपसेट आणि Android 11 वर चालतो. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.
▪️ HMD Global या स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष OS अपडेट आणि 4 वर्ष मासिक सेफ्टी अपडेट देणार आहे. फोटोग्राफीसाठी Nokia XR20 मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे.
▪️ यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
▪️ कनेक्टिविटीसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm जॅक आणि ब्लूटूथ 5.1 आहे. या फोनमधील 4630mAh ची बॅटरी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.