नोकिया T10 LTE भारतात खरेदीसाठी उपलब्ध; किंमत आहे 15000 पेक्षा कमी

नोकिया T10 LTE भारतात खरेदीसाठी उपलब्ध; किंमत आहे 15000 पेक्षा कमी

नोकियाने गेल्या महिन्यात भारतात आपला T10 टॅबलेट लॉन्च केला होता. Nokia T10 टॅब्लेट आत्तापर्यंत देशात फक्त वाय-फाय प्रकारात उपलब्ध होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नोकियाने गेल्या महिन्यात भारतात आपला T10 टॅबलेट लॉन्च केला होता. Nokia T10 टॅब्लेट आत्तापर्यंत देशात फक्त वाय-फाय प्रकारात उपलब्ध होता. आता HMD Global ने Nokia T10 टॅबलेटची LTE देखील देशात सादर केली आहे. नवीन टॅबलेटमध्ये देखील वाय-फाय व्हेरियंट प्रमाणेच वैशिष्ट्ये आहेत. Nokia T10 हा एक बजेट टॅबलेट आहे.

नवीन नोकिया टॅबलेट 8-इंचाचा LCD डिस्प्ले आणि HD रिझोल्यूशन ऑफर करतो. HD Netflix पाहण्यासाठी डिस्प्ले प्रमाणित आहे. टॅब्लेटला मागील पॅनलवर एक लहान चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल मिळतो. या नोकिया टॅबलेटमध्ये मागील बाजूस फोटोग्राफीसाठी 8-मेगापिक्सेल सेन्सर आहे. स्मार्टफोनच्या पुढील बाजूस 2-मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. Nokia T10 LTE टॅबलेट 1.66 GHz Unisoc T606 चिपसेटद्वारे आहे. टॅबलेटमध्ये ग्राफिक्ससाठी Mali G57 MP1 GPU उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. सॉफ्टवेअर बद्दल बोलायचे झाले तर Nokia T10 LTE व्हर्जन Android 12 ऑपरेटिंग सिस्टम सह येतो. 5250mAh बॅटरी आहे जी 10W चार्जिंग देते. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, Nokia T10 मध्ये 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ आणि USB टाइप-सी पोर्ट आहे.

Nokia T10 LTE व्हेरियंटच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,799 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,799 रुपये आहे. नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवर हा नोकिया टॅबलेट 15 ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com