Teach Update : धमाकेदार Nokia 5.4, Nokia 3.4 भारतात लाँच
लोकशाही न्यूज नेटवर्क
बाजारात दमदार पदार्पण करत नोकिया मोबाईल ब्रँडने बजेट फोनच्या कॅटेगरीमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Nokia 5.4 आणि Nokia 3.4 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये फ्रंट कॅमेरासाठी डिस्प्लेमध्ये पंच कटआउट होल देण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा फोन युरोपातील काही देशांमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता हा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे.
नोकिया 5.4 चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया 5.4 मधील फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 6.39 इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेजॉल्यूशनसह येतो. तसेच या फोनमध्ये पंच होल कटआउट दिला आहे.
जो सेल्फी कॅमेरासाठी आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 663 प्रोसेसर देण्यात आला आहे जो ऑक्टा कोर सीपीयू आणि अॅड्रिनो 610 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे.
या फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅमचा पर्याय देण्यात आला आहे. स्टोरेजसाठी या फोनमध्ये 64 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. नोकिया 5.4 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.
फोनचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. नोकिया 5.4 मध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 10W नॉर्मल चार्जिंगला सपोर्ट करते.
Nokia 5.4 हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे. यामधील 4GB + 64GB वेरिएंट ची किंमत 13,999 रुपये तर 6GB + 64GB वेरिएंटची किंमत 15,499 रुपये ठेवण्यात आली आहे.
नोकिया 3.4 चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया 3.4 मध्ये 6.3 इंचांचा का HD+ डिस्ले देण्यात आला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेजॉल्यूशनसह मिळतो. सेल्फी कॅमेरासाठी या फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआऊट देण्यात आला आहे.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो ऑक्टा कोर सीपीयू आणि अॅड्रिनो 610 जीपीयूसह येतो.
फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. युजर्स याची इंटर्नल स्टोरेज स्पेस 512 जीबीपर्यंत वाढवू शकतात. कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
त्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असून सोबत 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W नॉर्मल चार्जिंग स्पीडसह मिळते.
नोकिया 3.4 ची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. हा फोन 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटसह सादर करण्यात आला आहे.