Google Maps
Google Mapsgoogle

Google Maps चं नवं फीचर; प्रवास सुरू करण्याआधीच कळणार टोलसाठीचा खर्च

नवीन सुविधेद्वारे, तुम्हाला टोल असलेला मार्ग निवडायचा की टोल नसलेला मार्ग निवडायचा हे ठरवता येणार आहे.
Published by :
Vikrant Shinde
Published on

गुगलच्या सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्सपैकी एक असलेल्या Google Maps मध्ये नवे फीचर्स जोडले आहेत. सर्वात महत्त्वपुर्ण फीचर म्हणजे टोल टॅक्सचा एकुण खर्च आता वापरकर्त्यांना प्रवास सुरू करण्याआधीच समजणार आहे. याकरता गुगलने स्थानिक टोल प्राधिकरणाशी भागीदारी केली आहे. नवीन सुविधेद्वारे, तुम्हाला टोल असलेला मार्ग निवडायचा की टोल नसलेला मार्ग निवडायचा हे ठरवता येणार आहे.

टोल टॅक्सच्या खर्चाची कल्पना येण्यासाठी गुगल मॅप काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे परीक्षण करणार आहे. ही किंमत टोल पास किंवा पेमेंटच्या इतर कोणत्याही पद्धतीवर, आठवड्याचा दिवस आणि टोल पास करण्याची अंदाजे वेळ यावर अवलंबून असेल. भारतासह यूएस, जपान आणि इंडोनेशियामधील सुमारे 2,000 टोल रस्त्यांसाठी या महिन्यात Android आणि iOS वर टोलच्या किंमती सुरू होतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com