Motorola Moto E32
Motorola Moto E32Team Lokshahi

Motorola चा नवीन मोबाइल लाँच; दिवसभर टिकणार बॅटरी...

Motorola ने आज आपला स्वस्त स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला
Published by :
Saurabh Gondhali
Published on

Motorola ने आज आपला स्वस्त स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला आहे. कंपनीच्या ‘ई’ सीरीजमध्ये Moto E32 स्मार्टफोननं एंट्री घेतली आहे. हा लो बजेट हँडसेट 4GB RAM, Unisoc T606 SoC, 48MP Camera आणि 5,000mAh battery अशा स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे.  

Motorola Moto E32
Motorola चा Moto E7 Power स्मार्टफोन लॉन्च
Motorola Moto E32
Poco चा नवीन 5G मोबाईल लॉन्च..

मोटोरोलाने मोटो ई32 स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन आयपी52 वॉटर रेजिस्टन्स रेटिंगसह आला आहे.  

फोटोग्राफीसाठी मोटोरोला मोटो ई32 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.  

Motorola Moto E32
Moto G100 स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com