पेटीएमवरून रिचार्ज करताय तर सावधान, आधी ही बातमी वाचा
काही महिन्यांपूर्वी PhonePe ने मोबाइल रिचार्जवर सर्व्हिस चार्जच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केली होती, त्याला ग्राहकांनी जोरदार विरोध केला होता आणि आता पेटीएमनेही मोबाइल रिचार्जवर अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही पेटीएमने मोबाईल रिचार्ज केल्यास तुम्हाला 1 रुपये ते 6 रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. सेवा शुल्काची रक्कम तुमच्या रिचार्जच्या रकमेवर अवलंबून असते. (mobile apps paytm starts taking surcharge on mobile recharges after phonepe)
Paytm द्वारे केलेल्या सर्व पेमेंट मोडवर 1-6 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त शुल्क लागू होईल. तुम्ही Paytm द्वारे UPI पेमेंट केले तरीही तुमच्याकडून शुल्क आकारले जाऊ शकते. ट्विटरवर अनेक युजर्सनी याबाबत निषेधही नोंदवला आहे. पेटीएमनुसार, हे शुल्क प्लॅटफॉर्म चार्ज म्हणून घेतले जात आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही १०० रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज केल्यासच तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क घेतले जाईल.
तुमच्या माहितीसाठी, 2019 मध्ये पेटीएमने सांगितले होते की, ते कोणत्याही ग्राहकाकडून कधीही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारणार नाहीत. पेटीएमने यासंदर्भात ब्लॉगच्या लिंकसह ट्विटही केले होते. ट्विट आजही अस्तित्वात आहे पण ब्लॉगची लिंक कालबाह्य झाली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये PhonePe ने अधिकृतपणे सांगितले होते की, ते आता मोबाईल रिचार्जसाठी शुल्क आकारेल. कंपनीच्या विधानानुसार, 50 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज केल्यास 1 रुपये शुल्क आकारले जाईल आणि जर तुम्ही 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज केले तर तुम्हाला 2 रुपये आकारले जातील.