CrowdStrike Update: मायक्रोसॉफ्ट विंडोज जगभरात डाऊन
जगभरातील संगणक आणि लॅपटॉप सध्या ब्लू स्क्रीन ऑफ डेथला बळी पडले आहेत. कारण प्रसिद्ध सायबर सुरक्षा कंपनी CrowdStrike ने एक अपडेट जारी केले होते, ज्यानंतर MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप अचानक क्रॅश होत आहेत. लॅपटॉप आणि कम्प्युटरची स्क्रीन निळी पडून सिस्टम बंद पडली आहे. अचानक उद्भवलेल्या या स्थितीमुळे जगभरातील युजर्सला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
निळी स्क्रिन येत असून त्यावर एक मेसेज येत आहे. या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "तुमच्या कम्प्युटरमध्ये समस्या उद्भवली आहे आणि रिस्टार्ट करणे आवश्यक आहे. आम्ही फक्त काही त्रुटी, समस्येची माहिती गोळा करत आहोत आणि त्यानंतर तुमच्यासाठी रिस्टार्ट करु.." (Your PC ran into a problem and needs to restart. We're just collecting some error info, and then we'll restart for you.)
CrowdStrike अपडेट मुळे अनेक युजर्सला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजेच बीएसओडी चा सामना करावा लागत आहे. कंपनीच्या फोरवर एक रिपोर्ट आणि पीन केलेल्या मेसेजच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही स्वत:हून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू नका. CrowdStrike कडून या समस्येवर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे आणि या संदर्भात लवकरच तुम्हाला अपडेट करण्यात येईल.