Gmail चं नवीन फीचर; तुम्ही मोबाईलवरही आता तुमच्या आवडत्या भाषेत मेलचे भाषांतर करू शकता

Gmail चं नवीन फीचर; तुम्ही मोबाईलवरही आता तुमच्या आवडत्या भाषेत मेलचे भाषांतर करू शकता

तुम्ही मोबाईलवरही आता तुमच्या आवडत्या भाषेत मेलचे भाषांतर करू शकता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

तुम्ही मोबाईलवरही आता तुमच्या आवडत्या भाषेत मेलचे भाषांतर करू शकता. कारण गुगलने आपल्या जीमेल अॅपसाठी एक नवीन फिचर आणलं आहे. नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स आपल्याला हव्या असलेल्या भाषेत ईमेलचे भाषांतर करू शकणार आहेत. यूजर्स आपल्या आवडीच्या भाषेत सिंगल टॅपमध्ये भाषांतर करू शकतात.

यूजर्सना विशिष्ट भाषेतील ईमेलचे भाषांतर न करण्याची सुविधाही मिळणार आहे. यूजर्स सेटिंग पर्यायावर जाऊन आपल्याला कोणत्या भाषेत ईमेलचे ट्रान्सलेशन करायचे आहे त्यानुसार भाषा निवडू शकतात.हे फिचर मोबाईल जीमेल यूजर्ससाठी जारी करण्यात आलं आहे. यूजर्स ईमेलचे भाषांतर करू इच्छित नसतील, तर ते वर पाहिलेले बॅनल काढून टाकू शकतात.

आजपासून हे फिचर Gmail मोबाईल अॅपसाठी देखील जारी करत आहोत.तुम्‍हाला कोणत्याही त्रासाशिवाय एकाहून अधिक भाषांमध्‍ये संवाद साधण्‍यास मदत होणार आहे. यूजर्सना 100 हून अधिक भाषांमध्ये वेबवर Gmail मधील ईमेल सहजपणे भाषांतरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. असे Googleकडून सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com