Made in India | smartphone
Made in India | smartphoneteam lokshahi

मेड इन इंडिया स्मार्टफोन लवकरच महागणार, कारण...

...त्यामुळे मोबाइल कंपन्या अतिरिक्त खर्चाचा बोजा खरेदीदारांवर टाकू शकतात
Published by :
Shubham Tate
Published on

made in india smartphone : भारतात मोबाईल फोनची किंमत लवकरच वाढू शकते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने एक आदेश जारी केला आहे की, मोबाइल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकांवर अवलंबून सीमाशुल्क अधिक आकारले जाऊ शकते. स्मार्टफोनमध्ये समाविष्ट असलेल्या घटकांवर अधिक शुल्क आकारले गेले, तर मोबाइल कंपन्या अतिरिक्त खर्चाचा बोजा खरेदीदारांवर टाकू शकतात. (made in india smartphones get costlier as custom)

Made in India | smartphone
Adani Group : अदानी समूहावरील कर्जामुळे दबाव वाढला

पीटीआयमधील एका अहवालानुसार, बॅक सपोर्ट फ्रेम आणि डिस्प्ले असेंब्लीवरील आयात शुल्क 10 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. डिस्प्ले असेंब्लीसह अँटेना पिन, पॉवर की आणि इतर उपकरणे आयात केली असल्यास, 15 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. कंपन्या फक्त सिंगल डिस्प्ले आयात करत नाहीत तर डिस्प्ले असेंब्ली देखील आयात करतात. या असेंबली युनिटला स्क्रीनसोबतच स्पीकर आणि सिम ट्रे देखील जोडण्यात आला आहे.

Made in India | smartphone
चेहऱ्यासाठी झोपण्यापूर्वी 'या' तेलाचा करा वापर; जाणून घ्या फायदे

CBIC ने पुढे सांगितले की डिस्प्ले असेंबलीमध्ये अतिरिक्त घटक समाविष्ट असल्यास ते नोटीसचे उल्लंघन मानले जाईल. तर उद्योग असे म्हणत आहे की, मोबाइल फोनवरील डिस्प्ले सामग्रीशी संबंधित सर्व घटकांना डिस्प्ले असेंब्ली मानले जावे. त्यामुळे सीमाशुल्क 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

डिस्प्ले असेंब्लीबद्दल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) डिस्प्ले असेंब्लीची तपशीलवार यादी देण्यात आली आहे, जेणेकरून ते समजणे सोपे होईल. याशिवाय, डिस्प्ले असेंबलीमध्ये टच पॅनल, कव्हर ग्लास, ब्राइटनेस एन्हांसमेंट फिल्म, इंडिकेटर गाइड लाईट, रिफ्लेक्टर, एलईडी ब्लॅकलाइट, पोलारायझर आणि एलसीडी ड्रायव्हर यांचा समावेश होतो, जे फिलिसी प्रिंटेड सर्किटवर बसवलेले असतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com