जिओ दिवळीनिमित्त देणार 'या' चार शहरांना भन्नाच गिफ्ट

जिओ दिवळीनिमित्त देणार 'या' चार शहरांना भन्नाच गिफ्ट

रिलायन्स जीओने भारतात 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवात केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

1 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचं उद्घाटन झालं. तर आता, रिलायन्स जीओने भारतात 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवात केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चैन्नई या चार शहरांत जीओकडून दिवाळीपर्यंत 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे.

देशात फाईव्ह जीचे उद्घाटन झाल्यानंतर एअरटेलने आठ शहरांमध्ये 5G सेवेला प्रारंभ केला. त्यामुळे जीओनेही तत्काळ चार शहरांमध्ये चार शहरं निवडली आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या शहरांचा त्यात समावेश असून थोड्याच दिवसांत पुण्यातही 5G इंटरनेट सेवा विस्तारण्यात येणार आहे.

दिवसेंदिवस 4G प्लान्सच्या किंमतीत वाढ होत असतात 5G सेवेचे प्लान्स किती रुपयाला मिळतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, याबाबत अद्यापही काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. 4Gपेक्षा थोड्या जास्त किंमतीचे आणि जास्त डेटा असेलेल प्लान्स 5Gसाठी असतील असं सांगण्यात येतं आहे.

जिओ दिवळीनिमित्त देणार 'या' चार शहरांना भन्नाच गिफ्ट
EeVe Ahava इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 65 हजार, जाणून घ्या काय आहे रेंज, फीचर्स
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com