आजपासून जिओ 5Gची चार शहरांत सेवा सुरु होणार

आजपासून जिओ 5Gची चार शहरांत सेवा सुरु होणार

जिओ आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जिओ 5G सेवा सुरु करणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ चार शहरांमध्ये Jio 5G इंटरनेट सुरु करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जिओ आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जिओ 5G सेवा सुरु करणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ चार शहरांमध्ये Jio 5G इंटरनेट सुरु करण्यात येणार आहे. आजपासून जिओच्या True 5G सेवेची बीटा चाचणी सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सेवा केवळ निवडक युजर्सना वापरता येणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ चार शहरांमध्ये Jio 5G इंटरनेट सुरु करण्यात येणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या देशातील चार शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे.

ही जिओ 5G ची बीटा चाचणी आहे. बीटा चाचणी संपूर्ण देशात जिओ 5G सेवा लाँच होण्यापूर्वीचा एक टप्पा आहे. यामध्ये ग्राहकांचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार 5G नेटवर्कमध्ये बदल करण्यात येईल. जिओने सांगितलं आहे की, कंपनी आपल्या 425 दशलक्ष युजर्सना 5G सेवेचा नवीन आणि उत्कृष्ट अनुभव देऊ इच्छितो. याद्वारे भारताला डिजिटल क्रांती घडेल. असे रिलायन्सने सांगितले आहे.

युजर्सना 1Gbps पर्यंतचा वेग आणि अमर्यादित 5G डेटा मिळेल. आमंत्रित वापरकर्त्यांना Jio True 5G सेवेचा अनुभव घेता येईल आणि त्यांच्या अनुभवांच्या आधारे कंपनी सर्व ग्राहकांसाठी एकत्रित 5G सेवा सुरू करेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com