Mobile
MobileTeam Lokshahi

Infinix Note चे 2 नवीन मोबाईल लॉन्च...

फोनमध्ये सिनेमॅटिक ड्युअल स्पिकर्स
Published by :
Saurabh Gondhali
Published on

Infinix नं नव्या स्मार्टफोनसाठी मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्ससोबत भागेदारी केली आहे. कंपनीनं आज Infinix Note 12 series Doctor Strange Edition लाँच केला आहे. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन आले आहेत. यात पहिला फोन Infinix Note 12 आणि दुसरा Note 12 Turbo फोन आहे. चला जाणून घेऊया यांची संपूर्ण माहिती.  

Mobile
‘Vivo चा Y01’ मोबाईल लाँच...

Infinix Note 12 चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Note 12 मध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले, देण्यात आला आहे. ज्याला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. कंपनीनं फोनमध्ये सिनेमॅटिक ड्युअल स्पिकर्स देखील दिले आहेत. फोन MediaTek Helio G88 चिपसेटला सपोर्ट करतो. सोबत 4GB रॅम आणि 3GB व्हर्च्युअल रॅमची सुविधा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित ओएसवर चालतो. 

Mobile
Motorola चा ‘200MP’ कॅमेरासह नवीन मोबाईल येणार..

Infinix Note 12 Turbo चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Note 12 Turbo स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. यातील सिनेमॅटिक ड्युअल स्पिकर्स शानदार ऑडिओ क्वॉलिटी देतात. या फोनमध्ये MediaTek Helio G96 Octa-Core प्रोसेसर आहे. जो 8GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅमसह येतो. हँडसेट लेटेस्ट Android 12 आधारित XOS 10.6 वर चालतो. 

Infinix Note 12 चा 4GB RAM व 64GB स्टोरेज असलेला मॉडेल 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर दुसरा व्हेरिएंट 6GB RAM व 128GB स्टोरेजसह येतो. हा हँडसेट 27 मेपासून Flipkart वरून विकत घेता येईल. Infinix Note 12 Turbo चा 8GB RAM व 128GB स्टोरेज असलेला एकमेव मॉडेल 14,999 रुपयांमध्ये 28 मेपासून Flipkart वरून विकत घेता येईल.  

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com