आता दोन फोनमध्ये वापरता येणार सेम नंबरचं व्हॉट्सअॅप; वाचा असं करा अॅक्टिव्हेट!
प्रशांत जगताप, प्रतिनिधी
आज प्रत्येकजण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअअॅपचा वापर करतो. अनेकजणांचा दिवस सुरू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सअअॅपवर चॅटिंग करण्यात जातो.
दिवसागणिक वाढत जाणारी यूजर्सची संख्या लक्षात घेता यावरचा चॅटिंग आणि इतर गोष्टींचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा यासाठी व्हॉट्सअअॅपकडून वेळोवेळी नव-नवीन फीचर्स दिले जातात. मात्र, अनेकदा काही यूजर्स दोन फोन वापरत असतात. परंतु, व्हॉट्सअअॅप एकाच फोनमध्ये चालू असते.
परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही एकच व्हॉट्सअअॅप दोन फोनमध्ये वापरू शकणार आहात. विशेष म्हणजे दुसऱ्या फोनमध्ये सेमनंबरचे व्हॉट्सअअॅप चालू करण्यासाठी तुम्हाला सिमकार्डची अजिबात आवश्यकता नाहीये.
एकाच नंबरचे व्हॉट्सअअॅप दुसऱ्या फोनमध्ये कसे कराल अॅक्टिव्हेट 👇
1. एकाच नंबरचे व्हॉट्सअअॅप दुसऱ्या फोनमध्ये चालू करण्यासाठी सर्वात प्रथम वेब ब्राउझर ओपन करून web.whatsapp.com वर जा.
2. यानंतर Request desktop site वर क्लिक करा. येथे तुम्हाला एक QR कोड मिळेल.
3. वरील दोन स्टेप पूर्ण केल्यानंतर यूजर ज्या फोनमध्ये आधीपासून व्हॉट्सअअॅप वापरत आहे. त्या फोनमधील Settings मध्ये जाऊन व्हॉट्सअअॅप सिलेक्ट करा. येथे जर एखादा यूजर दुसऱ्या ब्राउझरवर व्हॉट्सअअॅप वापरत असेल तर, येथून लॉगआउट करणे गरजेचे आहे. असे न केल्यास QR स्कॅनर काम करणार नाही.
4. यानंतर यूजरला पहिल्या फोनवरून दुसऱ्या फोनमधील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. क्यूआर कोड स्कॅन होताच दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअअॅप अॅक्टिव्हेट होईल.
वरील सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर यूजर कोणत्याही अडचणींशिवाय दोन फोनमध्ये व्हॉट्सअअॅप वापरू शकतील. मात्र, हे करण्यापूर्वी यूजरला दुसर्या डिव्हाइसवर व्हॉट्सअअॅप लॉगइन करण्यापूर्वी आधीच्या डिव्हाइवरील व्हॉट्सअअॅप लॉगआउट करावं लागेल.