जाणून घ्या हिरो स्प्लेंडर HERO SPLENDER च्या नवीन किंमती...
सध्या रशिया RASIA युक्रेन YUKRANE या दोन देशांतील युद्धामुळे जागतिक अर्थकारणावर त्याचा मोठा विपरिणाम झाला आहे. श्रीलंकेमध्ये दिवाळखोरी घोषित करण्यात आली आहे. तर पाकिस्तान मध्ये सुद्धा बरेच राजकीय नाट्य घडले. एकंदरीत सध्या महागाई सर्वांना त्रास देते आहे. आपल्याकडे भारतात सुद्धा गॅसचे व पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या नुकतीच हिरो स्प्लेंडर HERO SPLENDER बाईक तिच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. या बाईक च्या किमती मध्ये 500 ते 1000 रुपये पर्यंत ची वाढ झाली आहे. तसेच कंपनीने काही बाईक व्हेरिएंट्स सुद्धा बंद केल्या आहेत. जाणून घेऊया त्या संदर्भातील सविस्तर माहिती.
बाईकचे बंद झालेले व्हेरिएंट्स
किमतीतील बदलाव्यतिरिक्त, Hero ने Super Splendor ची जुनी आवृत्ती आणि 100 मिलीयन एडीशन बंद केली आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, Hero Supersplendor कम्युटर बाइकला 124.7cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन इंजिन मिळते, जे 10.72 bhp आणि 10.6 Nm पीक टॉर्क देते त्याचप्रमाणे, स्प्लेंडर प्लस बाईकमध्ये 97.2cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 7.91bhp आणि 8.05Nm पीक टॉर्क देते.