तंत्रज्ञान
आता डेस्कटॉपवरही गुगल युजर्सना वापरता येणार ‘डार्क मोड’
मागील वर्षी गुगलनं मोबाइल युजर्ससाठी गुगल सर्चसाठीचे डार्क मोड फिचर दाखल केलं होतं. आता हे फिचर डेस्कटॉपवरही उपलब्ध झालं आहे.
गुगलनं अँड्रॉइड आणि आयओएस अॅप्ससाठी हे डार्क मोड फिचर मे 2020मध्ये दाखल केलं होतं. त्याचवेळी डेस्कटॉप युझर्ससाठी ते उपलब्ध करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.गुगलने फेब्रुवारी महिन्यात सर्च डेस्कटॉपवर डार्क मोडची चाचणी सुरू केली होती. गुगलचे प्रॉडक्ट सपोर्ट व्यवस्थापक हंग एफ यांनी आजपासून हे फिचर डेस्कटॉपवर उपलब्ध होत असल्याची घोषणा केली.पुढील काही आठवड्यात हे फिचर पूर्णपणे कार्यान्वित होईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यामुळे आता डेस्कटॉपवर गुगल सर्च या ब्राउझिंग इंजिनवरून सर्च करणाऱ्या युझर्सना ब्राईट वेबपेजेसचा रंग करडा करता येणार आहे. यामुळे डोळ्यावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.