व्हॉट्सएप वापरता? मग ही बातमी नक्की वाचा… वापरकर्त्यांसाठी खूषखबर!
सध्याच्या काळात व्हर्च्यूअली संवाद साधण्यासाठी लोक फोन करण्यापेक्षा मेसेज करून चॅट (Chatting) करणंच पसंत करतात. आणि चॅट करण्यासाठी सध्या केवळ तरूणाईच नव्हे तर, अगदी अबालवृद्धांचा आवडता मार्ग म्हणजे व्हॉट्सएप(Whatsapp) . ह्याचं कारण म्हणजे, व्हॉट्सएप हाताळण्यासाठी अगदी सहज-सोपं आहे.
व्हॉट्सएप वापरण्यासाठी अगदी सहज-सोपं तर आहेच त्याशिवाय त्यात असलेल्या व्हिडीओ कॉलिंग, ऑडिओ कॉलिंग, मीडिया शेअरींग, इत्यादी (Video Calling, Audio Calling, Media Sharing, Etc.) सुविधा व्हॉट्सएपला आणखीच आकर्षक बनवितात. मात्र, व्हॉट्सएप वापरताना अगदी सगळ्यांनाच येणारी अडचण म्हणजे… मोठ्या साईझची मीडिया फाईल शेअर करता न येणे. पण, वापरकर्त्यांची नेमकी हीच अडचण हेरून व्हॉट्सएप नवा अपडेट घेऊन येत आहे.
व्हॉट्सएपवर मोठ्या साईझच्या फाईल्स शेअर (Large Files Sharing) करता याव्यात अशी वापरकर्त्यांची दीर्घकाळापासून प्रतिक्षीत मागणी आहे. व्हॉट्सएपवर मोठ्या फाईल्स शेअर करताना यूजर्सना खूप त्रास होतो, मात्र ही समस्या आता संपणार आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सएपमध्ये लवकरच एक नवीन अपडेट येणार आहे, ज्यानंतर यूजर्स व्हॉट्सएपवर 2 जीबीपर्यंतच्या फाइल्स सहज शेअर करू शकतील.