जाणून घ्या तुमचा Gmail पासवर्ड किती Apps आणि Web sites शी आहे लिंक

जाणून घ्या तुमचा Gmail पासवर्ड किती Apps आणि Web sites शी आहे लिंक

Published by :
Published on

अनेक वेबसाईट्सवर लॉग-इन करण्यासाठी आपल्य़ाकडे दोन पर्याय असतात. यासाठी एक तर संपूर्ण माहिती भरावी लागते किंवा नवा आयडी-पासवर्ड बनवावा लागतो किंवा आपल्या जीमेल अकाऊंटवरुन त्या वेबसाईटवर एन्ट्री करावी लागते. त्यासाठी आपलं जीमेल अकाऊंट त्या वेबसाईटशी लिंक केलं जातं. मात्र काही दिवसांनी एकदा एखाद्या वेबसाईटचा वापर केल्यानंतर त्याचा वापर करणं सोडून दिलं जातं किंवा त्या वेबसाईटचा वापर करणंच बंद करतो. पण तरी देखील आपलं Gmail Account त्या वेबसाईटशी लिंक असतं.

आपलं Gmail Account किती वेबसाईट्सशी लिंक आहे हे पाहण्यासाठी, मोबाईलच्या Gmail App वर किंवा गुगल क्रोमवर जीमेल सुरू करावं लागेल. येथे तो जीमेल आयडी-पासवर्ड टाकावा लागेल, जो किती वेबसाईटशी लिंक आहे हे पाहायचं आहे. गुगल क्रोमवर लॉग-इन केल्यानंतर एक पेज समोर येईल. येथे स्क्रोल करुन सर्वात खाली यावं लागेल. येथे View Gmail in: Mobile/ Older version/Desktop दिसेल.

यापैकी Desktop या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर डेस्कटॉपवर जसे मेल दिसतात. तसेच सर्व मेल दिसतील. या पेजवरही स्क्रोल करुन सर्वात खाली यावं लागेल. येथे तुम्ही वापरलेल्या Gmail ची माहिती असेल. याच माहितीच्या बाजूला एक Details असा पर्याय दिसेल. तेथे Last Account Acitivity दिसेल, तेथे Details वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Security Checkup वर क्लिक करावं लागेल.

सर्वात खाली Your saved password दिसेल. येथे तुमचं जीमेल अकाऊंट किती वेबसाईट्सवर आणि App शी लिंक आहे, हे दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Go to Password Checkup वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा जीमेल आयडी-पासवर्ड येथे टाकावा लागेल. येथे त्या अनेक App आणि Websites बाबत माहिती मिळेल, जेथे तुमचं जीमेल अकाऊंट लिंक आहे. येथूनच साईड पॅनलवर क्लिक करुन अकाऊंट लॉग-आऊट करू शकता. जेव्हा तुम्ही कोणत्याही नव्या App किंवा वेबसाईटला भेट देते तेव्हा तुमचे जीमेल अकाऊंट तिथे लिंक आहे का हे नक्की तपासून पहा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com