‘या’ करणामुळे होतोय फेसबुकला ऑस्ट्रेलियामध्ये विरोध
सोशल मिडिया माध्यमातील फेसबुक हे मध्यम सर्वात प्रसिद्ध असून, जगभरातून त्याला प्रसिद्धी मिळत आहे. परंतु सध्या ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकला प्रचंड रोष प्रचंड रोषाला सामोरं जावं लागतंय. फेसबुक न्यूज फीडमधील बातम्या अचानक बंद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियातील नेटकऱ्यांनी फेसबुकला विरोध करत आहे.
फेसबुकने नियमात बदल करून वृत्त संकेतस्थळांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध घातल्याने सर्वच स्तरातून टीका आणि निषेध केला जात आहे. ऑस्ट्रेलियात सोशल मिडियावर बातम्या दाखवण्यासाठी पैसे द्यावे लागणार असा कायदा आलाय. या पाश्वभूमीवर फेसबुक आणि गुगलला न्यूज कंपन्यांना पैसे देण्याशी संबंधित हा कायदा आहे. यामुळं फेसबुकनं या विरोधात ऑस्ट्रेलियातल्या वृत्त संकेतस्थळांच्या बातम्या पोस्ट करण्यापासून रोखल्याय. तर अनेक विभागांना याचा फटका बसला आहे. यामध्ये हवामान, आरोग्य विभाग, आपत्कालीन सेवा, परदेशी संकेतस्थळ, सरकारी विभागचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियातील मानवाधिकार कार्यकर्त्यांकडूनही या गोष्टीचा निषेध केला जात आहे. फेसबुकच्या या निर्णयामुळे नागरिकांना आवश्यक माहिती न पोहचल्यानं अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेसबुककडून करण्यात आलेल्या कारवाईचा सर्वच स्तरांतून निषेध होताना फेसबुकला आपला निर्णय चांगलाच महागात पडल्याच दिसत आहे.