तंत्रज्ञान
कारचे स्वप्न बघताय, जाणून घ्या किती महागणार कार
कार खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.
कार खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र आता हे तुमचे स्वप्न महाग होणार आहे. गाडीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने मेमध्ये व्यावसायिक वाहनांच्या किमती ०.६ टक्के ते ५ टक्के वाढ केली आहे.
तसेच महिंद्रा अँड महिंद्राने एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा किमती वाढविल्या आहेत. मार्च-एप्रिल आणि मेमध्ये पुन्हा किमती वाढविण्यात आल्या आहेत.
खालीलप्रमाणे किंमत
महिंद्रा अँड महिंद्रा १५-५१ हजार
मारुती सुझुकी ०८-१५ हजार
टाटा मोटर्स ०३-१५ हजार
किया इंडिया ४०-५० हजार
होंडा १०-५० हजार
एमजी मोटर इंडिया ३५-६० हजार