भूकंपाचा काळात उपयुक्त असणारे हे पाच अॅप तुम्हाला माहित आहेत का ?
Team Lokshahi

भूकंपाचा काळात उपयुक्त असणारे हे पाच अॅप तुम्हाला माहित आहेत का ?

नेपाळसह भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खोल इतका होता.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

नेपाळसह भारत आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खोल इतका होता. नेपाळ हे भूकंपाचे केंद्रबिंदू असले तरीही दिल्लीसह नोएडा आणि गुरुग्राममध्ये काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या मोबाईल प्ले स्टोरवर अशी अॅप्स आहेत जी तुम्हाला अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करू शकतात. त्यापैकी अशा 5 अॅप्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्हाला या काळात सूचना आणि मदत करू शकतात.

भूकंपाचा काळात उपयुक्त असणारे हे पाच अॅप तुम्हाला माहित आहेत का ?
व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, एकाचवेळी 32 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार

Earthquake Network

हे अॅप भूकंपाबद्दलची माहिती शोधण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनचा वापर करते. तुमचा स्मार्टफोन एका आभासी नेटवर्कशी कनेक्ट होतो, त्याच वेळी त्या भागातील इतर युझरदेखील त्या नेटवर्कशी कनेक्ट होतात. त्याचा वापर करून डेटा क्राउडसोर्स करण्यात मदत होते आणि क्राउडसोर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या क्षेत्रातील भूकंपाच्या सूचना पाहू शकता.

Earthquake Pro

हे एक साधे-सोपे अॅप आहे. ज्यामध्ये तुम्हाला अलिकडच्या काळात झालेल्या सर्व भूकंपांची यादी मिळते, तसेच स्थानिक भूकंपाच्या सूचनांकडे लक्ष दिले जाते.

My Earthquake Alerts

जेव्हा भूकंप येतो तेव्हा युझरला त्या काळात पटकन माहिती हवी असते, त्यामुळे येणार्‍या भूकंपाबद्दल सूचना देणारे माय अर्थक्वेक अलर्ट निवडू शकतात. या अॅपमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भागाचे निरीक्षण करता येते.

Volcanoes and Earthquakes

तुम्हाला भूकंपाच्या माहितीपेक्षा इतर बाबीमध्ये रस असल्यास जसे की ज्वालामुखी आणि भूकंप अशा जगभरातील विविध नैसर्गिक घटना पाहण्याची आणि त्यांचा माहिती ठेवायची असेल तर तुम्ही हे अॅप वापरू शकतात.

LastQuake

हे युरो-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरचे अधिकृत अॅप आहे आणि भूकंपशास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. हे अॅप सार्वजनिक माहितीवरून भूकंपाची माहिती मिळवते आणि त्याच्या प्रमाणाचा अंदाज देते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com