Train Travel | IRCTC
Train Travel | IRCTCteam lokshahi

आता रेल्वेचं ऐनवेळी मिळणार कन्फर्म सीट, जाणून घ्या बुकिंगची नवी पद्धत...

रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा केली सुरू
Published by :
Shubham Tate
Published on

तुम्हालाही ट्रेनचा प्रवास आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की आता तुम्हाला रेल्वे तिकिटासाठी कुठेही जाण्याची गरज नाही आणि कोणत्या एजंटचीही गरज लागणार नाही. रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. (automobiles and gadget indian railway ticket booking irctc launched app confirmed ticket know process and deatils)

ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो, असे अनेकवेळा आपल्या निदर्शनात येते. मात्र अचानक ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे अवघड झाले आहे. या प्रकरणात, तुम्ही एकतर एजंटशी संपर्क साधा किंवा तत्काळ तिकिटासाठी प्रयत्न करा. पण तत्काळ तिकीट मिळणेही सोपे नाही. अशा स्थितीत रेल्वेच्या या सेवेमुळे सर्वसामान्यांची सोय होणार आहे. हे अॅप IRCTC च्या प्रीमियम भागीदाराने 'कन्फर्म तिकीट' नावाने आहे.

Train Travel | IRCTC
दिवसाला 45 रुपये वाचवून 36,000 रुपये पेन्शन मिळवा!

तत्काळ तिकिटांसाठी रेल्वेने आता नवीन अॅप लाँच केले आहे. हे अॅप फक्त IRCTC वेबसाइटवर उपलब्ध आहे. या अॅपद्वारे तुम्ही आरामात क्षणार्धात तत्काळ तिकिट बुक करू शकता. माहितीसाठी, यामध्ये कोणतेही अतिरिक्त पेमेंट करण्याची गरज नाही.

प्रवासी त्यांच्या सेव्ह डेटाद्वारे सकाळी 10 वाजल्यापासून अॅपवर तत्काळ तिकीट बुक करू शकतात. यानंतर, येथे तुम्ही या तिकिटाचे ऑनलाइन पेमेंट करू शकाल. पण लक्षात ठेवा तिकीट काढल्यानंतरही तिकीट वेटिंगमध्ये असू शकते. याशिवाय तुम्ही हे अॅप IRCTC नेक्स्ट जनरेशन मोबाइल अॅपवरूनही डाउनलोड करू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com