gadgets
gadgetsTeam Lokshahi

Asus चा नवीन लॅपटॉप लॉन्च; हे आहेत फीचर्स..

लॅपटॉप विंडोज 11 होम वर
Published by :
Saurabh Gondhali
Published on

ASUS नं भारतात ZenBook 14X OLED Space Edition आणि ZenBook 14 OLED हे दोन लॅपटॉप सादर केले आहेत. ASUS ZenBook 14X OLED स्पेस एडिशनमध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. हा कंपनीच्या रौप्यमहोत्सवाच्या निम्मिताने यंदाच्या CES मध्ये सादर करण्यात आला होता. आता या दोन्ही लॅपटॉप्सची एंट्री भारतात झाली आहे.  

gadgets
Motorola चा नवीन मोबाइल लाँच; दिवसभर टिकणार बॅटरी...

ASUS ZenBook 14X OLED Space Edition 

Asus ZenBook 14X OLED Space Edition मध्ये 14 इंचाचा 2.8K (2,880x1,800 पिक्सल) टचस्क्रीन OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HDR कंटेंट आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात i5-12500H, i7-12700H, आणि i9-12900H ची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबत इंटेल आयरिश एक्सई ग्राफिक्स आहेत. लॅपटॉप विंडोज 11 होम वर चालतो. सोबत 32GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 1TB पर्यंत M.2 PCIe Gen 4 SSD स्टोरेज मिळते.  

gadgets
Motorola चा नवीन मोबाइल लाँच; दिवसभर टिकणार बॅटरी...

ASUS ZenBook 14 OLED 

ZenBook 14 OLED मध्ये 14-इंचाचा 2.8K OLED नॅनोएज डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. जो 16:10 अस्पेक्ट रेशियो, 100% DCI-P3 कलर गामुट आणि 550-नाईट ब्राईटनेसला सपोर्ट करतो. डिवाइस 12th Gen Intel Core i5-1240P किंवा Intel Core i7-1260P प्रोसेसरसह विकत घेता येईल. सोबत 16GB LPDDR5 रॅम आणि 512GB PCIe 4.0 परफॉर्मन्स SSD मिळेल.  i5 व्हेरिएंटची किंमत 89,990 रुपये आहे, तर i7 मॉडेल 1,04,990 रुपयांमध्ये मिळेल.  

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com