Airtel ठरले देशातील पहिले 5G रेडी नेटवर्क

Airtel ठरले देशातील पहिले 5G रेडी नेटवर्क

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क | देशात 5G सेवा सुरू करण्याच्या बाबतीत एअरटेलने रिलायन्स जिओला पछाडले आहे.भारती एअरटेलने एका कमर्शिअल नेटवर्कवर लाईव्ह 5G ची यशस्वी चाचणी केली. अशी चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे.

एअरटेलने 1800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए (नॉन स्टँड अलोन) नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमद्वारे ही सेवा लाईव्ह केली.डायनॅमिक स्पेक्ट्रम शेअरिंगचा वापर करत एअरटेलने स्पेक्ट्रम ब्लॉकमध्ये 5G आणि 4G ची सेवा एकत्रितरित्या सुरू केली.दरम्यान, 5G सेवा रेडिओ, कोअर आणि ट्रान्सपोर्ट या सर्व डोमेनसाठी कम्पॅटिबल असेल असा दावा कंपनीने केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com