5 जीच्या दुनियेत टाटा ग्रुपची क्रांती
रिलायन्स जिओने आधीच 5G संदर्भात आपला मेगा प्लॅन जाहीर केला आहे. आता टाटा समूहही या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा सन्सने दूरसंचार उपकरणे बनवणाऱ्या तेजस नेटवर्क मधील नियंत्रक भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारामुळे टाटा समूहाची एंट्री 5G मध्ये होईल आणि ती नोकिया , एरिक्सन आणि हुआवेई सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकेल.
रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओच्या मदतीने आपण भारत 2G फ्री आणि 5 जी सक्षम बनवू. त्यांनी आश्वासन दिले की, देशात फक्त रिलायन्स जिओने 5G सुरू करेल. रिलायन्स जिओने अत्याधुनिक स्टँडअलोन 5 जी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रचंड प्रगती केली आहे, जे वायरलेस ब्रॉडबँडसाठी एक मोठी झेप आहे. मुकेश अंबानी म्हणाले की 5 जी चाचण्या दरम्यान जिओने 1 जीबीपीएसपेक्षा जास्त वेग यशस्वीपणे गाठला आहे. अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली होती.