मीठ निर्मितीपासून ते विमान उडवण्यापर्यंतचा प्रवास! टाटाने शेअर केला खास VIDEO
भारताच्या सर्वांगीन विकासात काही मोठ्या उद्योग समुहांचा महत्वाचा वाटा आहे. त्यातील एक मोठा समुह म्हणजे टाटा समुह. मीठ बनवण्यापासून ते देशाच्या लष्कराची वाहनं तयार करण्यापर्यंतचं काम टाटा समूह करत आला आहे. त्यातच आता टाटा समुहाने एअर इंडिया कंपनी देखील विकत घेतली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या टाटा समुहाचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी कित्येक तास कमी पडतील. पण अशातच टाटा समुहाने एक व्हिडिओ रिलीज केलाय, ज्यामध्ये फक्त तीन मिनिटांत टाटाने आपला प्रवास उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
टाटा उद्योग समुहाने अशी अनेक काम केली आहेत, जी भारताच्या उद्योग क्षेत्रात पहिल्यांदा झाली आहेत. टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी कंपनीची स्थापना केल्यापासूनच कंपनीनं अशी अनेक कामं केली ज्यामुळे टाटा समुहाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या माहिनुसार Humidifire आणि Firesprinkler सारखी उपकरणं कधीच कोणत्याही कंपनीत लावण्यात आली नव्हती. जी टाटा समुहाने १८७७ साली लावली होती. एवढंच नाही तर १९०७ ला पहिल्यांदाच देशात स्टील प्लांट तयार करण्यात आला तर १०१२ ला सिमेंट प्लांट तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे शिक्षण क्षेत्रात देखील टाटा समुहाचं मोठं योगदान असून, टाटा इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना त्यातून करण्यात आली आहे.
दरम्यान, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या टाटा समुहाने पहिल्यांदाच देशात केल्या. त्यामुळे टाटा समुहाची ओळख ही इतर उद्योग समुहांपेक्षा वेगळी आहे.