पाकिस्तानी मीडियाचं तालिबानीकरण
दोन दशकांनंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर पुन्हा सत्ता सस्थापित केली. परंतु याचे पडसात आता संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) हे सातत्यानं अफगाणिस्तान (Afghanistan) मधील तालिबान सरकार योग्य असल्याचं सांगत आहेत. जगानं तालिबानला वेळ द्यावा, अशी मागणी करत आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचा मीडिया देखील मागं नाही. पाकिस्तान न्यूज चॅनलच्या अँकरनं (TV News Anchor) शुक्रवारी हिजाब घालणे योग्य असल्याचं सांगंत भर कार्यक्रमात हिजाब घातला.
समा टीव्हीच्या न्यूज अँकरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हिजाब घातल्यानंतर विचार बदलत नाहीत, असा दावा तिनं केलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
या टिव्हीवरील लाईव्ह कार्यक्रमात पाकिस्तानचे प्राध्यापक परवेज हुडभोय उपस्थित होते. त्यांनी पाकिस्तानच्या विद्यापीठात मुली हिजाब घालून जात असल्याचं सांगितलं. तालिबानने दाखवले खरे रंग, महिलांच्या मंत्रालयात महिलांनाच बंदी कशावर घेतला आक्षेप कायदे आझम विद्यापीठातील प्राध्यापक परवेज हुडोभाय यांनी या कार्यक्रमात म्हंटले की, 'मी 1973 सालापासून शिकवण्यास सुरुवात केली आहे. 47 वर्षांपूर्वी क्वचितच एखादी मुलगी बुरखा घातलेली दिसत असे. पण, आता बुरखा ही सामान्य गोष्ट बनली आहे.
त्यांच्या उत्तरानं महिला अँकर चांगलीच नाराज झाली. ती इतक्यावरच थांबली नाही तर तिनं लाईव्ह कार्यक्रमात हिजाब घालून दाखवला. हिजाब हा मुस्लीम धर्माचा महत्वाचा घटक आहे आणि हिजाब परिधान करणे किती महत्वाचे आहे हे तीने या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.