India
गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग; मंत्रिमंडळातील २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी
गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथविधी पार पडला आहे. या मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून १० जणांना कॅबिनेट तर १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.
भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत कहल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्री
- राजेंद्र त्रिवेदी
- जितेंद्र वघानी
- ऋषिकेश पटेल
- पूर्णश कुमार मोदी
- राघव पटेल
- उदय सिंह चव्हाण
- मोहनलाल देसाई
- किरीट राणा
- गणेश पटेल
- प्रदीप परमार
राज्यमंत्री
- हर्ष सांघवी
- जगदीश ईश्वर
- बृजेश मेरजा
- जीतू चौधरी
- मनीषा वकील
- मुकेश पटेल
- निमिषा बेन
- अरविंद रैयाणी
- कुबेर ढिंडोर
- कीर्ति वाघेला
- गजेंद्र सिंह परमार
- राघव मकवाणा
- विनोद मरोडिया
- देवा भाई मालव