कुरिअर कंपनीत सापडल्या ९७ तलवारी; पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
पिंपरी चिंचवड : शहरातील दिघी पोलिसांनी (PCMC Police) डी. टी. डी. सी. कुरिअर कंपनीच्या कार्यालयातुन ९७ धारदार तलवारी, २ कुकरी आणि ९ म्यान जप्त केले आहेत. दिघी परिसरातील डी. टी. डी. सी. कंपनीच्या गोदामातून पोलिसांनी या तलवारी जपत केल्या आहेत. दिघी परिसरातील डी. टी. डी. सी. कुरिअर कंपनीच्या गोदामातूनच औंगाबाद मध्ये तलवारी पोहचल्याच पोलीस तपासात उघडकीस आलं होत. (Pimpri chinchwad Police Seize swords in DTDC Courier Company)
औंगाबादमध्ये कुरिअर ने तलवारी आल्या नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील कुरिअर कंपन्यांच्या कंपनीत आलेलं सामन मेटल डिटेक्टर मशिन वापरून तापसण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्कॅनींग करताना डी. टी. डी. सी. कंपनीत ९७ तलवारी, ३ कुकरी आणि ९ म्यान दिघी पोलिसांनी जप्त केलेत.
दिघी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पंजाब राज्यातील उमेश सुद आणि मनिदर तसेच औंगाबाद मधील अनिल होन आणि अहमदनगर मधील आकाश पाटील विरोधात भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरिअरने तलवारी सारखी घातक शस्त्रं पुरविणाऱ्या आरोपींचा शोध दिघी पोलीस करत आहेत.