Video भावनिक प्रसंग : राष्ट्रपती, पंतप्रधानांनी यांच्यांसाठी खुर्ची सोडली

Video भावनिक प्रसंग : राष्ट्रपती, पंतप्रधानांनी यांच्यांसाठी खुर्ची सोडली

Published by :
Jitendra Zavar
Published on

'योग सेवक' या नावाने प्रसिद्ध असलेल्या 125 वर्षांच्या स्वामी शिवानंद (Swami Sivananda)यांना आज पद्मश्रीने गौरविण्या आले. परंतु विशेष म्हणजे त्यांच्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)व राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Narendra Modi)यांनी खुर्ची सोडली. सध्या हा व्हायरल व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

स्वामी शिवानंद पुरस्कार घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंडवत घातलं. नंतर त्यांनी राष्ट्रपतींना दंडवत घातलं. स्वामी शिवानंद यांना पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: जागेवरुन उठून त्यांच्याजवळ आले आणि त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

वाराणसी येथील 125 वर्षाच्या स्वामी शिवानंद यांनी त्यांचे आयुष्य हे भारतीय जीवन पद्धती आणि योगाच्या प्रसारासाठी खर्ची केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्या पुरस्काराचे वितरण आज राष्ट्रपती भवनमध्ये केलं गेलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com