म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया, तपासणी करणारी पहिली नगरपालिका

म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया, तपासणी करणारी पहिली नगरपालिका

Published by :
Published on

अंबरनाथ नगरपालीका तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाली असून म्युकरमायकोसिससाठी शस्त्रक्रिया आणि स्वतंत्र तपासणी कक्ष अंबरनाथच्या दंत महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयाच्या आवारात सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कान, नाक, घसा आणि डोळे तपासण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रे आणण्यात आली आहेत. म्युकरमायकोसिसची स्वतंत्र शस्त्रक्रिया आणि तपासणी करणारी अंबरनाथ ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.

पालिकेने महाविद्यालयाच्या आवारात स्वतंत्र प्राणवायू निर्मितीची यंत्रण बसवली आहे. या यंत्रणेमुळे एकावेळी सलग तीन दिवस पुरेल इतका प्राणवायू निर्माण करता येणार आहे. म्युकरमायकोसिसच्या स्वतंत्र रुग्णांवर गरज भासल्यास शहरातच शस्त्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने सज्ज ठेवले आहे.

शस्त्रक्रिया केल्यानंतरच्या उपचारासाठी १५ खाटांचा स्वतंत्र विभागही दिला आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया विभागाचा आणि पुढील उपचाराचा खर्च अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com