रिलायन्स समूहाला झटका.. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमेझॉनच्या पारड्यात!
उद्योगजगताचं लक्ष लागून असलेल्या एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. रिलायन्स आणि किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील फ्यूचर समूह यांच्यात महत्वाचा करार झाला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या कराराला स्थगिती दिली आहे.
सिंगापूरमधील लवादाने दिलेला निकाल भारतातही लागू होईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यामुळे एमेझॉन कंपनीच्या पारड्यात हा निर्णय पडला आहे. मात्र फ्यूचर आणि अमेझॉनसाठी हा धक्का मानला जातोय.
प्रसिद्ध फ्यूचर समूहाचे भारतातील काही किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील मालकी हक्क रिलायन्स समूहाने विकत घेतले होते. तब्बल २४ हजार ७१३ कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, रिलायन्स आणि फ्यूचर समूहात झालेल्या या व्यवहाराला अमेझॉन कंपनीने विरोध केला होता. फ्यूचर समूहाच्या कंपनीत अमेझॉनची ४९ टक्के मालकी आहे. त्यामुळे या व्यवहारानुसार जर कंपनी विकली जाते, त्यावेळी ती खरेदी करण्याचा अधिकार सर्वात आधी अमेझॉनचा ठरतो. पण, रिलायन्स-फ्यूचर करारात याचं पालन केलं गेलं नाही, असं अमेझॉननं म्हटलं होतं.
यानुसार अमेझॉनने न्यायालयात धाव घेतली. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेत कराराला स्थगिती दिली आहे.