सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण; कॉंग्रेसच्या शशी थरूर यांची मुक्तता करण्याची मागणी
पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या मृत्यू प्रकरणात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी मुक्तता करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात थरूर यांच्यावर आरोपी असल्याचा गुन्हा दाखल होता. ज्येष्ठ वकील विकास पाहवा यांनी दिल्ली कोर्टात हि मागणी केली.
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर हिची 17 जानेवारी 2014 रोजी एका लक्झरी हॉटेलच्या स्वीट मधे मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्याच्यावर पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या खटल्यात आरोपी असल्याचा गुन्हा दाखल आहे.
ज्येष्ठ वकील विकास पाहवा हे थरूर यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी याप्रकरणी आपल्या अशिलाची मुक्तता करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, कलम ४९८ ए (क्रूरतेचा आरोप असलेल्या महिलेचा पती किंवा नातेवाईक) किंवा ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) यापैकी कोणताही गुन्हा सिध्द होण्यासाठी पुरावा मिळाला नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूला अपघाती मानले पाहिजे, असे पाहवा म्हणाले.